कुडाळ हायस्कूल, कुडाळ शताब्दी महोस्तव १९२०- २०२०

दिनांक 20/01/2022 रोजी मालवण पॉलिटेक्निक आयोजित जिल्हस्तर विज्ञान प्रदर्शनात तृतिय क्रमांक प्राप्त झाला. या ऑनलाईन प्रदर्शनात आपल्या प्रशालेतील प्रथमेश केरवडेकर आणि विश्वजीत परीट या विद्यार्थ्यानी धरणाच्या जलसाठ्यावर सौरउर्जेमार्फत वीजनिर्मिती हा प्रकल्प मांडला होता.

‘धरणाच्या साठवलेल्या पाण्याच्या निम्म्या पृष्ठभागावर तरंगते सौरघट स्थापित केले तर त्यातील जलचर आणि जलीय वनस्पतींना धोका पोहोचणार नाही. बाषापीभवनाचा वेग निम्मम्याने घटेल आणि विपुल वीजनिर्मिती होईल. ही वीज वाहून नेण्यासाठी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाच्या स्थापित यंत्रणेचाच उपयोग करता येईल. या प्रकल्पासाठी अतिरीक्त भूसंपादनाची गरज नसल्याने भूसंपादन आणि पुनर्वसनाचा खर्च टाळता येईल. त्यामुळे हा प्रकल्प सर्वार्थाने उपयुक्त सिद्ध होईल.’ अशा संकल्पनेवरील हा प्रकल्प परीक्षकांना विशेष भावला.

Close Menu