कुडाळ हायस्कूल, कुडाळ शताब्दी महोस्तव १९२०- २०२०

कुडाळ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कुडाळ येथे बुधवार दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी नीती आयोग पुरस्कृत अटल टिंकरींग लॅबोरेटरीचे उद्घाटन झाले. क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री. भाईसाहेब तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवा ओशनोग्राफीचे प्रिंन्सिपल सायन्टिस्ट आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ.श्री. नरसिंह ठाकूर यांचे शुभ हस्ते शिरगांव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.शमसुद्दीन अत्तार तसेच ए.बी.एल.एज्युकेशनचे महाराष्ट्र रीजन हेड श्री. सुजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम साजरा झाला. सदर कार्यक्रमास क.म.शि.प्र.मंडळाचे सर कार्यवाह श्री. वैद्य सर, सहकार्यवाह श्री. चव्हाण सर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिरसाट सर, प्रशालेचे माजी प्रचार्य श्री. का.आ.सामंत सर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. गणपत तेर्से, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जामसंडेकर सर, उपमुख्याध्यापक श्री. गुरबे सर, श्री. हावळ सर, पर्यवेक्षक श्री. शिरहट्टी सर, श्री.आजगांवकर सर, ए.टी.एल. इनचार्ज श्री. योगानंद सामंत सर , सर्व अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Close Menu