कुडाळ हायस्कूल, कुडाळ शताब्दी महोस्तव १९२०- २०२०

शाळेचा प्रवास व आवाहन

      आपण सर्वाना माहीतच आहे की, आपल्या सर्वांच्या कुडाळ हायस्कूल,कुडाळ या प्रशालेने २ जानेवारी २०१९ रोजी १००व्या वर्षात पदार्पण केले आहे.

      कुडाळ हायस्कूल,कुडाळ ही प्रशाला तत्कालीन सावंतवाडी संस्थानाचे अधिपती श्रीमंत पंचम खेमराज उर्फ बापू साहेब महाराज यांनी २ जानेवारी १९२० साली स्थापन केली.तत्पूर्वी कुडाळमध्ये इंग्रजी शिक्षक देण्याचे प्रयत्न १९२० सालापासून सुरु होते. या कार्यात कै. सखाराम भिखाजी वैद्य, कै.धोंडू आबाजी कोटणीस, कै. नारायण बाबुराव शिरसाट, कै. भास्कर अनंत वैद्य यांचा महत्वाचा सहभाग होता. परंतु हे स्वरूप [खासगी मालकी] असे होते. शाळेचे नाव आणि जागा ही बदलत होत्या. परंतु १९२० साली ही शाळा संस्थानाच्या ताब्यात आली आणि तिला कुडाळ हायस्कूल,कुडाळ नाव मिळाले. शाळेला स्वतःची इमारत मिळाली.त्यात सहा वर्ग खोल्या व एक हॉल होता . १९२० साली या शाळेत इयत्ता ५ म्हणचे इंग्रजी पहिली ते मेट्रिक म्हणजे इंग्रजी इयत्ता ७ वी असे वर्ग होते.

       भारत स्वातंतत्र होईपर्यन्त ही शाळा सावंतवाडी संस्थानाच्या मालकीची होती. त्यानंतर शाळेचा ताबा तत्कालीन मुंबई सरकार कडे गेला.

      कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था १९२९ साली अखंड हिंदुस्तानात कराची येथे स्थापन झाली. कराची मध्ये त्याकाळी अनेक मराठी कुटुंबे राहत होती. परंतु या मराठी लोकांसाठी मराठी माध्यमातून शिक्षणाची सोया नव्हती. त्यामुळे कै. द.व. अणावकर गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळातील कोकणी लोकांनी कराची मध्ये १२ जून १९२९ रोजी श्री. शिवाजी हायस्कूल या नावाने शाळा सुरु केली .

         दरम्यान १९४७ साली भारत स्वातंत्र्य झाल्यावर फाळणी मुळे कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना कराची सोडून भारतात परतावे लागले.१९४८ साली भारतातील सर्व संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आली.त्यामुळे कुडाळ हायस्कूल,कुडाळची मालकी मुंबई सरकार कडे गेली.मुंबई सरकारने कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकर्त्याचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन हि शाळा कै.श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या अनुमतीने क.म.शि.प्र. मंडळाकडे सुपूर्त केली.

            क.म.शि.प्र.मंडळाच्या नेतृत्वाखाली हळूहळू या शाळेचा सर्वागीण विकास होऊ लागला.१९७४ शाळेला कला ,वाणिज्य ,व विज्ञान या उचंमाध्यमिक तुकडया जोडल्या गेल्या.१९९३ साली  अभाय्साकांची तुकडी सुरु झाली .२००२ साली प्रशालेत संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान हे दोन नावीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन अमृत महोत्सव ही बेचाळीस वर्ग असलेली नवीन इमारत बांधण्यात अiली.

         गेली अनेक वर्षे सातत्याने प्रशालेच्या १०वी १२वी चा निकाल ९०% पेक्षा जास्त लागत आहे.शिष्यवृत्ती परीक्षेला प्रशाळेतील मुले राज्यात चमकत आहेत. २००४ साली प्रशालेच्या अभय आनंद पाटील हा विद्यार्थी इयत्ता १०वीत राज्यात प्रथम आला होता. आज प्रशालेत सुस्सज नाट्यगृह , व्हर्चुएल कलासरूम , इंग्रजी संभाषणासाठी भाषा लॅब , प्रशस्त संगणक प्रयोगशाळा , बॅटमिंटन हॉल , मैदान , महिला वस्तीगृह अशा सर्व सोईसुविधा संस्थने उपलब्ध केल्या आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासाला वाव देण्यासाठी नृत्य ,नाट्य व संगीत यांचे परिपूर्ण प्रशिक्षण देणारी आरती प्रभू कला अकॅडमी सुरु केली आहे. तंंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर रहाण्यासाठी प्रशालेमध्ये अटल टिंकरींग लॅबोरेटरी सज्ज आहे. लहान मुलांसाठी बालोद्यान , महिलांसाठी मोफत व्यायामशाळा व जे . इ . इ. आणि नीट परीक्षांसाठी सुसज्य ग्रंथालय व मार्गदर्शन वर्ग सुरु केले आहेत. शैक्षणिक , कला व क्रीडा सत्रात प्रशालेचे विद्यार्थी राज्य स्तरावर चमकत आहेत .

         आज कुडाळ हायस्कूल ही शाळा विविध प्रकारच्या शिक्षण पूरक सोयी सुविधांनी परिपूर्ण असून सुमारे ३००० विद्यार्थी या सुविधांचा लाभ घेत आहेत.थोडक्यात कुडाळ हायस्कूल ही मातृसंस्था परिसरातील सर्व विद्यार्थीही व नागरिक यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असते.

Close Menu