........शाळेचा एक सुंदर प्रवास.........
.......अदयावत कार्यक्रम.........
-
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कुड
January 20, 2022दिनांक 20/01/2022 रोजी मालवण पॉलिटेक्निक आयोजित जिल्हस्तर विज्ञान प्रदर्शनात तृतिय क्रमांक प्राप्त झाला. या ऑनलाईन प्रदर्शनात आपल्या प्रशालेतील प्रथमेश केरवडेकर आणि विश्वजीत परीट या विद्यार्थ्यानी धरणाच्या जलसाठ्यावर सौरउर्जेमार्फत वीजनिर्मिती हा प्रकल्प मांडला होता. ‘धरणाच्या साठवलेल्या पाण्याच्या निम्म्या पृष्ठभागावर तरंगते सौरघट स्थापित केले तर त्यातील जलचर आणि जलीय वनस्पतींना धोका पोहोचणार नाही. बाषापीभवनाचा वेग निम्मम्याने घटेल
-
कुडाळ हायस्कूलमध्ये अटल टिंकरींग लॅब
January 19, 2022कुडाळ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कुडाळ येथे बुधवार दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी नीती आयोग पुरस्कृत अटल टिंकरींग लॅबोरेटरीचे उद्घाटन झाले. क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री. भाईसाहेब तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवा ओशनोग्राफीचे प्रिंन्सिपल सायन्टिस्ट आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ.श्री. नरसिंह ठाकूर यांचे शुभ हस्ते शिरगांव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.शमसुद्दीन अत्तार तसेच ए.बी.एल.एज्युकेशनचे महाराष्ट्र रीजन हेड श्री. सुजय पाटील
-
कुडाळ हायस्कूलच्या 44 विद्यार्थ्यांच
January 19, 2022शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१ रोजी कुडाळ हायस्कूलच्या ४४ विद्यार्थ्यांनी दोन मार्गदर्शक शिक्षकांसह पणजी, गोवा येथे भरलेल्या इंटरनॅशनल सायन्स,टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्री एक्स्पोला भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यानी प्रथम इस्रोने बनवलेल्या प्रदर्शन वाहनाला भेट दिली. विविध याने, उपग्रह, उपग्रह प्रक्षेपण याने यांची माहिती तेथे उपस्थित शास्त्रज्ञांकडून विद्यार्थ्यानी करून घेतली. नंतर मुख्य प्रदर्शन तंबूमध्ये अणुविज्ञान, रेडिओ तंत्रज्ञान,
-
-
........... न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करणाऱयांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत........
.........यश संपादित विद्यार्थी व शिक्षक (सन २०१८ - २०१९)......
प्रशालेतील विविध सोई सुविधा


दिनांक 20/01/2022 रोजी मालवण पॉलिटेक्निक आयोजित जिल्हस्तर विज्ञान प्रदर्शनात तृतिय क्रमांक प्राप्त झाला. या ऑनलाईन प्रदर्शनात आपल्या प्रशालेतील प्रथमेश केरवडेकर आणि विश्वजीत परीट या विद्यार्थ्यानी धरणाच्या जलसाठ्यावर सौरउर्जेमार्फत वीजनिर्मिती हा प्रकल्प मांडला होता.
'धरणाच्या साठवलेल्या पाण्याच्या निम्म्या पृष्ठभागावर तरंगते सौरघट स्थापित केले तर त्यातील जलचर आणि जलीय वनस्पतींना धोका पोहोचणार नाही. बाषापीभवनाचा वेग निम्मम्याने घटेल आणि विपुल वीजनिर्मिती होईल. ही वीज वाहून नेण्यासाठी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाच्या स्थापित यंत्रणेचाच उपयोग करता येईल. या प्रकल्पासाठी अतिरीक्त भूसंपादनाची गरज नसल्याने भूसंपादन आणि पुनर्वसनाचा खर्च टाळता येईल. त्यामुळे हा प्रकल्प सर्वार्थाने उपयुक्त सिद्ध होईल.' अशा संकल्पनेवरील हा प्रकल्प परीक्षकांना विशेष भावला.

कुडाळ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कुडाळ येथे बुधवार दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी नीती आयोग पुरस्कृत अटल टिंकरींग लॅबोरेटरीचे उद्घाटन झाले. क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री. भाईसाहेब तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवा ओशनोग्राफीचे प्रिंन्सिपल सायन्टिस्ट आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ.श्री. नरसिंह ठाकूर यांचे शुभ हस्ते शिरगांव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.शमसुद्दीन अत्तार तसेच ए.बी.एल.एज्युकेशनचे महाराष्ट्र रीजन हेड श्री. सुजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम साजरा झाला. सदर कार्यक्रमास क.म.शि.प्र.मंडळाचे सर कार्यवाह श्री. वैद्य सर, सहकार्यवाह श्री. चव्हाण सर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिरसाट सर, प्रशालेचे माजी प्रचार्य श्री. का.आ.सामंत सर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. गणपत तेर्से, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जामसंडेकर सर, उपमुख्याध्यापक श्री. गुरबे सर, श्री. हावळ सर, पर्यवेक्षक श्री. शिरहट्टी सर, श्री.आजगांवकर सर, ए.टी.एल. इनचार्ज श्री. योगानंद सामंत सर , सर्व अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१ रोजी कुडाळ हायस्कूलच्या ४४ विद्यार्थ्यांनी दोन मार्गदर्शक शिक्षकांसह पणजी, गोवा येथे भरलेल्या इंटरनॅशनल सायन्स,टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्री एक्स्पोला भेट दिली.
या भेटीत विद्यार्थ्यानी प्रथम इस्रोने बनवलेल्या प्रदर्शन वाहनाला भेट दिली. विविध याने, उपग्रह, उपग्रह प्रक्षेपण याने यांची माहिती तेथे उपस्थित शास्त्रज्ञांकडून विद्यार्थ्यानी करून घेतली. नंतर मुख्य प्रदर्शन तंबूमध्ये अणुविज्ञान, रेडिओ तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, डि.आर.डि.ओ. ची प्रगती, विविध हस्तकला अशा विविधांगी विषयांची रेलचेल असलेले प्रदर्शन पाहताना विद्यार्थी तहानभूक हरपून गेले. तीन तास कधी निघून गेले हे कळलेच नाही. निसर्ग विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी तर या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बसवून बॉयंट फोर्स ही संकल्पना सोप्या इंग्रजी भाषेत सुरेखरीत्या समजावून सांगीतली.
यानंतर प्रदर्शन स्थळापासून जवळच असलेल्या आयनॉक्स या चित्रपटगृहाकडे सर्वांची जेवणाची व्यवस्था आयोजकांनी केली. अत्यंत चविष्ट जेवणाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. सर्वांना भूक पण तशीच सपाटून लागली होती.
जेवणानंतर तेथील चित्रपटगृहात विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारीत लघुपट दाखवले गेले. प्रत्येक लघुपटानंतर त्या लघुपटाच्या निर्मात्याच्या मुलाखती विद्यार्थ्यांना एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या होत्या.
या प्रदर्शनाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि गोवा ओशनोग्राफीचे प्रिंन्सिपल सायंटिस्ट डॉ.श्री.नरसिंह ठाकूर तसेच प्रशालेच्या माजी शिक्षिका आणि आता गोवा येथील महाविद्यालयात प्राध्यापिका असणाऱ्या सौ. शुभांगी नाईक यांनी कक्षेबाहेर जावून मोलाची मदत केली. प्रशालेचे शिक्षक श्री. योगानंद सामंत आणि सौ. मनिषा कुबल यानी या प्रदर्शन भेटीचे संपूर्ण नियोजन आणि यशस्वी आयोजन केले.

शिष्यवृत्तीधारक यश संपादित विदयार्थीं
